आषाढीवारी पालखी सोहळा

Waht_is_NLP

श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी पायी दिंडीद्वारे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा होत असतो. या सोहळ्यामध्ये सुमारे ५० ते ६० हजारांच्या संख्येने वारकरी महाराजांच्या पालखी बरोबर प्रवास करीत असतात. हा पालखी सोहळा ज्येष्ठ शुद्ध १४/१५ या दिवशी त्र्यंबकेश्वरहून निघतो आणि आषाढ शु.१० या दिवशी पंढरपूर येथे पोहचतो. त्यानंतर दशमी ते आषाढ शुद्ध १५ पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे श्री निवृत्तिनाथ महाराज मठ (बेलापूर – अंमळनेरकरमठ) प्रदक्षिणारोड या ठिकाणी असतो. पौर्णिमेला परतीचा प्रवास सुरूं होतो व श्रावण शु.३ या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे पोहचतो. या संपूर्ण सोहळ्यामध्ये रथाच्या मागे व पुढे एकूण ५० दिंडया समाविष्ट होतात. त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था दिंडी प्रमुख करतात. तसेच भोजनाची व्यवस्था प्रत्येक गांवकरी करीत असतात. आता श्री निवृत्तिनाथ महाराज वारकरी भजनी मंडळ यासंस्थेद्वारे रथाच्या पुढील एक क्रमांकाच्या दिंडीचे नियोजन असते. भोजनाची, पाण्याचे टँकर , सामानांसाठी ट्रक अशी व्यवस्था केली जाते. शिवाय संस्थान मार्फतहि पाण्याचे टँकर , सामानासाठी ट्रक अशी व्यवस्था केली जाते.