नाशिक त्र्यंबकेश्वरला कसे यावे?

नाशिक त्र्यंबकेश्वरला कसे यावे?

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तीन सोपे मार्ग (जसे रस्त्याने, रेल्वेने व हवाईमार्गे) आहेत.

 

  • नाशिक ते त्र्यंबक मार्ग  त्र्यंबकेश्वर ते नाशिक हे २९.५ कि.मी. इतके अंतर आहे.
  • पुणे ते नाशिक मार्ग - हे अंतर २४०.५ किमी इतके आहे.
  • मुंबई ते त्र्यंबकेश्वर मार्ग - हे अंतर १८५.७ किमी इतके आहे.
  • शिर्डी ते त्र्यंबकेश्वर मार्ग - हे अंतर ११६.५ किमी इतके आहे.
  • ठाणे ते त्र्यंबकेश्वर मार्ग – हे अंतर घोटीमार्गे १५७ किमी इतके आहे.
  • औरंगाबाद ते त्र्यंबकेश्वर मार्ग - अनेक भाविक औरंगाबाद जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी औरंगाबाद-नाशिक महामार्गाने येऊन पुढे नाशिक पासून त्र्यंबकेश्वरला पोचतात. औरगांबाद ते नाशिक १९७ किमी व पुढे २८ असे एकूण २२५ किमी इतके अंतर आहे.
  • जव्हार ते त्र्यंबकेश्वर मार्ग – हे अंतर ५१ किमी इतके आहे.

रेल्वेमार्ग:

विविध राज्यांमधून रेल्वेमार्गाने आपण नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येऊ शकतात व त्यानंतर तिथून पब्लिक वेहिकल ने त्र्यंबकेश्वरला पोहचता येते.

हवाईमार्ग:

निवडक राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकच्या नजीकचे ओझर विमानतळ उपलब्ध आहे. जिथून खाजगी वाहने घेऊन थेट त्र्यंबकेश्वरला पोचता येते.

महत्वाचे निवेदन: कुठल्याही पूजेच्या सविस्तर माहितीसाठी आपण आमच्या वेब पोर्टलवर दिलेल्या अधिकृत “ताम्रपत्रधारी” गुरुजींशी संपर्क साधावा..