श्री निवृत्तिनाथ महाराज यात्रा

 

 

श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधि निमित्त होणाऱ्या उत्सवामध्ये वारकरी बांधवांना आषाढीवारी पालखी सोहळ्यामुळे हजर राहता येत नसल्यामुळे श्री निवृत्तिनाथ महाराजांचा यात्रा उत्सव पौष वद्य ११ या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाची सुरूवात पौष वद्य ५ पासून होते व याची सांगता पौष वद्य १४ /अमावास्या या दिवशी होते. यामध्ये परंपरागतमान्यवरांची कीर्तने व जागर त्यांच्या ठरलेल्या दिवशी होत असतात.पौष वद्य १० दिवशी रात्री १२ वाजता संस्थान मार्फत पुजारी महाराजांची नित्य पूजा करतात. त्या नंतर त्रिंबकेश्वर नगर पालिकेतर्फे आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते.पौष वद्य ११ दिवशी दुपारी ४ वाजता महाराजांचा रथोत्सव होतो . महाराजांच्या पादुका श्री त्रीम्बाकेश्वराच्या भेटीला नेल्या जातात पौष वद्य १३ चे दिवशी पंढरपूर येथील देहूकर फडामार्फत काल्याचे कीर्तन होते व सर्व आलेल्या दिंडयांना नारळ प्रसाद देऊन निरोप दिला जातो. या उत्सवाची सांगता पौष वद्य १४ या दिवशी प्रक्षालन पूजनाने व रात्री काढ्याच्या कीर्तनाने होते.

याशिवाय श्री निवृत्तिनाथ मंदिरामध्ये रामनवमी , हनुमान जयंती , कृष्ण जन्माष्टमी , श्री ज्ञानेश्वर महाराज समाधि सोहळा , श्री तुकाराम बीज , श्री एकनाथ षष्ठी हे उत्सवहि साजरे केले जातात.