श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा
श्री निवृत्तिनाथ महाराजांचा समाधि सोहळा ज्येष्ठ वद्य १२ या दिवशी असतो. त्यावेळी पालखी सोहळा असल्यामुळे या सोहळ्यास सर्व वारक-यांना उपस्थित राहता येत नाही. हा सोहळा संस्थान मार्फत पालखी सोहळ्यामध्ये नगर मुक्कामी साजरा केला जातो. यावेळी नगर येथे पुजारी कुटुंबीयांमार्फत समाधि सोहळ्याचे किर्तन केले जाते.
तसेच त्र्यंबकेश्वर येथे ज्येष्ठ वद्य ५ ते ज्येष्ठ वद्य १२ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले जाते. व ज्येष्ठ वद्य १२ या दिवशी समाधि सोहळा साजरा केला जातो.