त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती मराठी व अधिकृत पुरोहितांचा (गुरुजींचा) इतिहास:

पौराणिक कथांनुसार ज्योतिर्लिंगा पासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झाली आहे ज्यामुळे इथे केले जाणारे सर्व मनोरथ सफल होतात. भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्त होण्यासाठी इथे अनेक प्रकारचे जप-तप-व्रत मनोभावे करून आपले आराध्य शंकरांना प्रसन्न करण्यासाठी येतात.

बाळाजी बाजीराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे ह्यांनी त्र्यंबकेश्वर मधील विविध पूजा करणारे ज्ञानसंपन्न पुरोहितांना ताम्रपत्र प्रदान केले जे आजही पिढ्यानपिढ्या संरक्षित केले आहे. तेंव्हापासून ताम्रपत्र प्राप्त असलेल्या गुरुजींना "ताम्रपत्रधारी गुरुजी" म्हणून ओळखले जाते. “ताम्रपत्र” म्हणजे तांब्याच्या धातूने बनविलेल्या पत्र्यावर कोरलेले “अधिकार पत्र’’ होय. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरव मंदिरात उपस्थित असलेले गुरुजी हे अधिकृतरित्या ताम्रपत्रधारी असल्याने केवळ त्यांनाच पूजा करण्याचा विशेष परंपरागत अधिकार प्राप्त आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर व मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक अनुष्ठाने करण्याचा परंपरागत अधिकार हा इथल्या स्थानिक गुरुजींकडेच आहे.

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात अधिकृत पुजारी किंवा ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली नारायण नागबळीकालसर्प योग शांती पूजात्रिपिंडी श्राद्धकुंभ विवाहरुद्र अभिषेकमहामृत्युंजय मंत्र जाप अशा विधी शास्त्रोक्त पद्धतीने विशिष्ट मुहूर्तावर संपन्न केल्या जातात. अशा पावन स्थळी होणाऱ्या अध्यात्मिक पूजेचा लाभ घेण्यासाठी यजमानांनी अधिकृत गुरुजींनाच संपर्क करावा.

प्राचीन काळापासून त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या भाविकांनी केलेल्या अनेक पूजांचे वर्णन ह्या पिढ्यानी जपून ठेवले आहे. इथे येणाऱ्या यजमानांना पूजेची यथायोग्य माहिती व मार्गदर्शन हे या गुरुजींद्वारे केले जाते. अनेक काळापासून इथल्या मान्यवरांनी भाविकांच्या सोयीसाठी एकजूट होऊन कार्य केले कालांतराने त्याचे रूपांतर "पुरोहित संघ" नावाने नोंदणीकृत करण्यात आले आहे. पूजा-अनुष्ठान करण्यासाठी येणाऱ्या यजमानांना इथल्या अधिकृत गुरुजींची ओळख पटावी यासाठी "पुरोहित संघ" सर्व गुरुजींना नोंदणीकृत प्रमाणपत्र बहाल करते तसेच ताम्रपत्राची काळजी घेते.