उटीची वारी

What_is_NLP

यासाठी संस्थानमार्फत चैत्र वद्य ५ ते चैत्र वद्य १२ पर्यंत नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी सात दिवस रोज भाविक भक्त चंदन उगाळून त्याची उटी तयार करतात व चैत्र वद्य ११ च्या दिवशी ही उटी समाधिस लावली जाते व त्याच दिवशी रात्री या उटीचा प्रसाद सर्व वारकरी भक्तांना वाटण्यात येतो. यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येथे जमतात. या उटीच्या प्रसादाने अनेक व्याधी, संसारीताप निवृत्त होत असल्याचा लोकांचा अनुभव आहे. यासाठी वारक-यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था संस्थानमार्फत पूर्वीपासून ठरवून दिलेल्या गांवां मार्फत केली जाते.

चैत्र वद्य १२ या दिवशी काल्याच्या कीर्तनाने तसेच संध्याकाळी रथोत्सवाने नगर प्रदक्षिणा करून या उत्सवाचा समारोप होत असतो.